[ad_1]
कोमट पाण्याचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने उत्तम मानले गेले आहे. तसेच या कोमट पाण्याच्या जोडीने लिंबाचा रस, आवळ्याचा रस, मध इत्यादी घेणे ही आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. यामुळे शरीराचे पचनतंत्र सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठासारख्या समस्या दूर होतात. कोमट पाण्याच्या सेवनाने शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकली जात असल्याने त्वचेच्या आरोग्यासाठी देखील याचे सेवन उत्तम आहे. कोमट पाण्याच्या जोडीने हिंगाचे सेवनही फायदेशीर आहे. हिंग हा पदार्थ बहुतेक सर्वांच्याच स्वयंपाकघरामध्ये सहज सापडणारा आणि दररोजच्या भोजनामध्ये वापरला जाणारा आहे. याच्या वापराने आमटी-भाजीची लज्जत वाढतेच, पण त्याशिवाय हिंगाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले आहे.
मासिक पाळीच्या वेळी अनेक महिलांना पोटदुखीचा त्रास होतो. या वेदना कमी करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यामध्ये पाव चमचा हिंग मिसळून हे पाणी प्यायल्याने पोटदुखी कमी होते. याचबरोबर गरम पाण्यासोबत हिंगाचे सेवन दम्याचा विकार असणाऱ्यांसाठी किंवा श्वासनाशी निगडित समस्यांवर प्रभावी औषध आहे. ज्यांना किडनी स्टोन किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स असतील त्यांच्यासाठीही गरम पाणी आणि हिंगाच्या मिश्रणाचे सेवन उत्तम आहे. हिंग आणि पाण्याच्या सेवनाने पचनतंत्र चांगले रहात असून, यामुळे पित्त शमते.
गरम पाण्याच्या सोबत हिंगाचे सेवन मधुमेहींच्या करिता ही उपयुक्त आहे. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल्स नियंत्रित ठेवण्याचे काम हिंग करते. त्याचबरोबर हाडांच्या बळकटीसाठी देखील हिंगाच्या पाण्याचे सेवन चांगले आहे. हाडांच्या सोबतच दातांनाही बळकटी देणारे हे मिश्रण आहे. याच्या नियमित सेवनाने अनिमिया दूर होत असून, कर्करोग प्रतीरोधी तत्वे ही हिंगामध्ये असल्याने दररोज हिंग आणि गरम पाण्याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक मानले गेले आहे.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही
[ad_2]
Source link