आता आणखी सुरक्षित होणार व्हॉट्सअॅप डेस्कटॉप लॉगइन

Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली : मागील काही दिवसांमध्ये सर्वाधिक वापरात असणाऱ्या व्हॉट्सअप या मेसेजिंग अॅपच्या गोपनीयता धोरणाची बरीच चर्चा पाहायला मिळाली होती. त्यातच आता सर्वांचे लक्ष या अॅपमधील आणखी एका अपडेटने वेधले आहे. अॅपच्या डेस्कटॉप लॉगइनच्या दृष्टीने ही अपडेट अत्यंत महत्त्वाची आहे. व्हॉट्सअॅप वेबच्या लॉगइन संदर्भातील ही अपडेट आहे .

व्हॉट्सअपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता डेस्कटॉपवर युजर्सना लॉगइन करतेवेळी क्यूआर कोडचा वापर करण्यापूर्वी फेस प्रिंट किंवा फिंगरप्रिंट अनलॉकचा वापर करावा लागणार आहे. आतापर्यंत यासाठी फक्त क्यूआर कोडचाच वापर करण्यात येत होता.

अशा प्रकारे वापरा हे फिचर

  • व्हॉट्सअॅप वेब अथवा व्हॉट्सअॅप डेस्कटॉपमध्ये अकाऊंट लिंक करण्यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरु करा.
  • त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात दिलेल्या तीन ठिपके असणाऱ्या चिन्हावर क्लिक करुन सेटींग्ज मध्ये जा.
  • त्यामध्ये व्हॉट्सअप वेब अथवा डेस्कटॉपवर क्लिक करा.
  • तिथं Link a Device या पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर पुढील प्रक्रिया फोनच्या बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनला फॉलो करा.
  • लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर जर तुमचे अकाऊंट दुसऱ्या कोणत्या ठिकाणहून लॉगइन दिसले तर ते तातडीने लॉगआऊट करा.

    व्हॉट्सअॅप युजर्सना येत्या काही दिवसांमध्ये मल्टी डिव्हाइस लॉगइन फीचरही मिळण्याची चिन्हे आहेत. येत्या काळात युजर्स एकाच वेळी अनेक डेस्कटॉपवर एकच व्हॉट्सअॅप अकाउंट सुरु करु शकतात. सध्या मात्र एकाच डिव्हाइसवर लॉगइन करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

[ad_2]

Source link


Spread the love