[ad_1]
नवी दिल्ली: कृषी कायद्यांच्या निषेधार्थ काँग्रेसच्या खासदारांचा मोर्चा माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. यावेळी खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन त्यांना शेतकरी आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करणार आहेत. या निवेदनावर दोन कोटी जणांनी सह्या केल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढावा यासाठी राहुल गांधी आणि विरोधी पक्षनेते यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. मात्र, त्यावर राष्ट्रपती किंवा केंद्र सरकार यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे काँग्रेसचे खासदार उद्या विजय चौक ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा काढणार आहेत. त्याचवेळी राष्ट्रपतींना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती खासदार के सुरेश यांनी दिली.
नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर सुमारे महिनाभरापासून तहान मांडून आहेत. सरकार आणि आंदोलक यांच्यात चर्चेच्या ५ फेऱ्या झाल्या असून त्या निष्फळ ठरल्या. सरकार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यास तयार आहेत. मात्र, या सुधारणा शेतकऱ्यांना मान्य नाहीत. कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत.
[ad_2]
Source link