जिओने बंद केले चार स्वस्त प्लॅन्स

Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली – आपल्या जिओ फोनसाठी असलेले चार स्वस्त प्लॅन्स टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने बंद केले आहेत. 99 रुपये, 153 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांचे चार रिचार्ज प्लॅन कंपनीने बंद केले आहेत.

युजर्सना जिओने बंद केलेल्या 99 रुपये, 297 रुपये आणि 594 रुपयांच्या प्लॅनमध्ये 0.5 जीबी डेटा मिळायचा. अनुक्रमे 28 दिवस, 84 दिवस आणि 168 दिवस या तिन्ही प्लॅन्सची वैधता होती. तिन्ही प्लॅन्समध्ये अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंह आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटे मिळायची. तर, युजर्सना 153 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1.5 जीबी डेटा मिळायचा.

तसेच अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉइस कॉलिंग आणि नॉन-जिओ कॉलिंग मिनिटांसह 100 एसएमएस प्रतिदिन मिळायचे. कंपनीने अलिकडेच अनलिमिटेड कॉलिंगची सेवा सुरू केल्यामुळे हे प्लॅन बंद केल्याचे सांगितले जात आहे. आता हे चार स्वस्त प्लॅन्स बंद झाल्यानंतर तुम्ही पर्याय म्हणून तुमच्यासाठी कंपनीकडे 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये आणि 185 रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत.

[ad_2]

Source link


Spread the love