देशोदेशीच्या विचित्र विवाह रूढी – Majha Paper

Spread the love

[ad_1]


नोव्हेंबर महिन्यात बॉलीवूडमधील पीसी आणि डीप्पी म्हणजे आपल्या लाडक्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोने आपापल्या जोडीदारांबरोबर चतुर्भुज होत आहेत आणि त्याची जोरदार चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहे. या दोघी कोणत्या पद्धतीने लग्न करणर, कोणते रिती रिवाज पाळणार याचीही चर्चा होते आहे. मात्र जगात भारत हा एकमेव देश नाही जेथे विचित्र विवाह रूढी किंवा रिवाज पाळले जातात. जगात अनेक देशात विवाहात विचित्र प्रथा पाळल्या जातात. त्याची हि माहिती


विकसित देश आणि फॅशनची मक्का असलेल्या फ्रांस मध्ये लग्न जेवणावळीनंतर उरलेले अन्न जोडप्याचे मित्रमंडळी एकत्र करून त्यापासून सूप बनवितात आणि ते टॉयलेटच्या कुंडीत भरून ठेवतात. हे सूप प्यायल्याखेरीज नवऱ्याला नवरी भेटत नाही. स्कॉटलंडमध्ये वधूवराना घराबाहेर नेऊन त्यांच्यावर दारू, राख, पिसे, पीठ टाकली जातात. या मागे त्यांना दृष्ट लागू नये असा संकेत असतो.


जर्मनीमध्ये वधूवर उपस्थित पाहुण्यांसमोर लाकडाचा एक ओंडका करवतीने कापतात. हा ओंडका व्यवस्थित कापला गेला तर हे जोडपे एकमेकांच्या आयुष्यातील चढउतारीच्या काळात एकमेकांची साथ देईल असे मानले जाते. कोरियात वर सासूला बदक भेट देतो. त्यामागे तुमच्या मुलीबरोबर मी एकनिष्ठ राहीन असा संकेत असतो. हल्ली मात्र वधूवर एकमेकांना लाकडी बदक देतात.


जमैका मध्ये पाहुण्यांना फळे आणि डार्क रम पासून बनविलेला काळा केक खिलाविण्याची प्रथा आहे. तर केनियात नवरा नवरी गाव सोडून जातात तेव्हा मुलीच्या डोक्यावर आणि छातीवर वडील थुंकतात. यामागेही नवविवाहित जोडप्याचे वाईट नजरांपासून संरक्षण व्हावे हा उद्देश असतो.


फिलिपिन्स मध्य लग्नानंतर जोडपे दोन कबुतरे आकाशात उडवितात. त्यामागे त्यांचे जीवन शांततेत, सुखात आणि समृद्धीत जावे असा हेतू असतो. इटली मध्ये लग्नाला आलेल्या पाहुण्यांना चॉकलेट दिली जातात आणि लग्न लागल्यावर मुलगी सासरी निघाली कि हि चॉकलेट तिच्या अंगावर उडविली जातात.
पोलंड मध्ये वऱ्हाडी वधूबरोबर नृत्य करण्यासाठी पैसे देतात. जे पैसे जमा होतील त्याचा वापर नवविवाहितांच्या हनिमूनसाठी केला जातो.


रोमानियात वधूचे आलेले पाहुणे अपहरण करतात आणि वराने तिला दारू, पैसे देऊन वाचवायचे असते.[ad_2]

Source link


Spread the love