पंतप्रधान मोदींसह, सर्व मुख्यमंत्री, खासदार आणि आमदारांना दिली जाणार कोरोना लस

Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली – मागच्या शनिवारपासून देशामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांचे पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार १६ जानेवारीपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली. पण आता दुसऱ्या टप्प्यामध्ये देशातील राजकीय नेत्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे.

यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व खासदार, आमदार यांच्याबरोबरच इतर आजार असणाऱ्या राजकीय नेत्यांचे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे अनेक दिग्गज नेते हे ८० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. ८० हून अधिक वय असणाऱ्या नेत्यांमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एचडी देवगौडा यांच्याबरोबरच भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

कोरोना लसीकरणाची मोहीम टप्प्याटप्प्यांमध्ये राबवली जाणार असल्याचे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. एप्रिल महिन्यामध्ये कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मंत्र्यांबरोबर नेत्यांना यामध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यात अगदी पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. सध्याची आकडेवारी पाहिली तर लोकसभेमधील तीनशेहून अधिक नेते ५० पेक्षा जास्त वर्षांचे आहेत. तर राज्यसभेमधील २०० हून अधिक खासदार हे वयाची पन्नाशी ओलांडलेले आहेत.

भारत सरकार पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटी वैद्यकीय कर्मचारी आणि पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना कोरोनाची लस देणार असून दुसरा टप्पा मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, असे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

केंद्र तसेच राज्य सरकारने प्रत्येक टप्प्यातील कोरोना लसीकरणासाठी विशेष तयारी केल्याचे सांगितले जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनीधिंना कोरोनाची लस दिली जाणार नाही. कोरोना लसीकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने यासंदर्भातील माहिती दिली असून त्यांच्या हवाल्यानेच हे वृत्त देण्यात आले आहे.

कोरोना लसीकरण मोहीमेला सुरुवात होण्याच्या आधीच देशामध्ये या लसीसंदर्भात अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लसीकरणाचे नियोजन करणाऱ्या राष्ट्रीय कृती दलाने देशातील २७ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा सहभाग महत्वाचा असेल असे म्हटले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या नेत्यानेच कोरोनाची लस घेतल्यास या लसीसंदर्भात लोकांमध्ये असणारा भ्रम दूर होऊन ते सुद्धा स्वच्छेने कोरोना लसीकरणासाठी पुढे येतील.

[ad_2]

Source link


Spread the love