पुणेकरांच्या चिंतेत भर! इंग्लंडवरुन परतलेला व्यक्ती निघाला कोरोनाबाधित

[ad_1]


पुणे – इंग्लंडमधून डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवास करून परतलेल्या पुण्यातील एका व्यक्तीचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य आधिकाऱ्याने दिली आहे. सध्या त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून, त्याच्या आढळलेली लक्षणे इंग्लंडमध्ये उद्रेक झालेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनशी मिळती-जुळती आहेत का, हे तपासण्यासाठी त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगर पालिकेचे सहायक मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली आहे.

तो व्यक्ती पुण्यात १३ डिसेंबर रोजी परतला होता. त्याचा कोरोना रिपोर्ट १७ तारखेला पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्या तरुणाला कोरोनाच्या नव्या ‘स्ट्रेन’ची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) ‘जेनेटिक सिक्वेन्सिंग’ चाचणी करण्यात येणार असल्याचेही वावरे म्हणाले. युरोप आणि मध्यपूर्व आशियातून राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबरदरम्यान ५४४ नागरिक दाखल झाले आहेत. त्यापैकी ३०० प्रवासी पुण्यातील असून, त्यांचा शोध लागला आहे. या सर्वांना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती वावरे यांनी दिली.

कोरोनाचे दोन नवीन प्रकार ब्रिटनमध्ये आढळून आल्यामुळे सगळ्या देशांनी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. ब्रिटनमधून येणारी प्रवासी विमानेही थांबवण्यात आली आहे. पण कोरोनाच्या नव्या प्रकाराचे संक्रमण ब्रिटनमध्ये सुरू असतानाच पुण्यात परतलेल्या एका व्यक्तीमुळे खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणामध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नसल्याने घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

Share

You may also like...

%d bloggers like this: