पुर्ण तयारीनिशी भारतीय दुरसंचार क्षेत्रात उतरणार एलन मस्क यांची टेस्ला

Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली – अब्जाधीश मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर गेल्या तीन-चार वर्षांपासून अक्षरश: राज्य केले आहे. या जिओला आता जगातील सर्वात मोठा अब्जाधीश नेस्तनाभूत करण्यासाठी येत आहे. एलन मस्क असे या अब्जाधीशाचे नाव आहे. भारतात टेस्ला कारच्या एन्ट्रीनंतर मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉरपोरेशन (स्पेसएक्स) स्टारलिंक प्रोजेक्ट भारतात आणणार आहे. यानंतर भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठा भूकंप होणार आहे.

भारतात सुरुवातीच्या काळात स्पेसएक्स 100 Mbps सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. कंपनी भारतात या तयारीनिशी उतरण्याची शक्यता आहे. मस्क आपल्या कंपनीचा 1 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये विस्तार करणार आहेत.

Analyticsindiamag वेबसाइटनुसार मस्क यांच्या कंपनीने भारत सरकारकडे सॅटेलाईट बेस्ड ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीची सेवा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. गेल्या वर्षी एक प्रस्ताव ट्रायने पाठविला होता. स्पेसएक्सने याला उत्तर पाठविले आहे. यामध्ये स्पेसएक्सची विंग सॅटेलाईट गव्हर्नमेंट अफेअर्सने हाय स्पीड सॅटेलाईट नेटवर्क भारतात सर्व लोकांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीने जोडण्याच्या लक्ष्यामध्ये मदत करू शकते, असे म्हटले आहे.

इंटरनेट युजरची भारत मोठी बाजारपेठ आहे. येथे 70 कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. यांची संख्या 2025 पर्यंत वाढून 97.4 कोटी होण्याची शक्यता आहे. भारतात सध्या इंटरनेट स्पीड 12 Mbps आहे. 5जी आल्यानंतर भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. पण, गाव आणि दुर्गम भागात इंटरनेट पोहोचविण्यास वेळ लागणार आहे. स्पेसएक्सच्या स्टारलिंक प्रोजेक्टने हेच काम आरामात केले जाऊ शकते. कारण थेट सॅटेलाईटवरून या भागात इंटरनेट सेवा पुरविता येणार आहे. याचसोबत ही सेवा कमी किंमतीतही उपलब्ध होणार आहे. फायबर ऑप्टिक केबल टाकण्यास हजारो कोटी लागणार आहेत. त्यापेक्षा वायरलेस असलेल्या सॅटेलाईट सेवेद्वारे खर्चही कमी येणार आहे.

[ad_2]

Source link


Spread the love