Thursday, January 28, 2021
टाइम्स ऑफ मराठी
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
टाइम्स ऑफ मराठी
No Result
View All Result

रोचक इतिहास मैसूरपाकाचा – Majha Paper

by admin
December 26, 2020
in Top news
0
0
SHARES
800
VIEWS
Share on Facebook

[ad_1]


म्हैसूरमधील गजबजलेल्या सयाजी राव रस्यावरील या मिठाईच्या दुकानाकडे कोणाचे आवर्जून लक्ष जाईलच असे नाही, पण ‘गुरु स्वीट मार्ट’ नामक या दुकानामागे अतिशय रोचक इतिहास आहे. फारतर तीनचार गिऱ्हार्ईकांना उभे राहण्यासाठी जेमतेम जागा असणाऱ्या या वीतभर दुकानातच मैसूरपाक बनविण्याची कल्पना सुमारे शंभर वर्षांपूर्वी अस्तित्वात आली, आणि या पदार्थाचा ‘जन्म’ झाला.

मैसूरचे महाराज कृष्णराजा वोडेयार (१८८४-१९४०) हे मोठे खवय्ये होते. निरनिराळ्या उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेण्याची आवड त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या ‘अंबा विलास’ या महाली भला मोठा मुदपाकखाना ( स्वयंपाकघर ) असे. कृष्णाराजे हे जातीचे खवय्ये असल्याने त्याच्या मुदपाकखान्यामध्ये अगदी पाश्चात्य पदार्थांपासून ते अगदी पारंपारिक पदार्थांपर्यंत सर्व काही बनविले जात असे. त्यांच्या महाली असलेल्या देवघरांचा प्रसादही याच मुदपाकखान्यामध्ये तयार होत असे.

महाराज कृष्णराजांना मिठाई अतिशय प्रिय होती. एकदा महाराजांच्या भोजनासाठी सर्व पदार्थ तयार झाले, पण त्यांचे मुख्य खानसामा काकासुर माडप्पा ह्यांनी महाराजांसाठी मिठाई बनविली नाही. भोजनासाठी थोडाच अवधी उरला होता आणि इतक्या कमी वेळामध्ये कुठलाही गोड पदार्थ बनविणे शक्य नव्हते. पण तरीही महाराजांसाठी कोणता ना कोणता गोड पदार्थ बनविणे आवश्यक होते. त्यामुळे माडाप्पाने एक नवीनच प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. चण्याच्या डाळीचे पीठ, तूप आणि साखर एकत्र करून त्यांनी पाक (मिश्रण) तयार केला. हा मऊ पाक थाळीमध्ये घालून, त्याच्या वड्या कापून, ह्या वड्या कृष्णराजांसमोर त्यादिवशीची मिठाई म्हणून पेश केल्या गेल्या. कृष्णराजांना ह्या वड्या इतक्या आवडल्या, की त्यांनी ह्या वड्या पुन्हा पुन्हा मागून घेऊन खाल्ल्या.

इतकी लाजवाब मिठाई खाऊन तृप्त झालेल्या महाराजांनी जेव्हा आपल्या खानसाम्याला ह्या मिठाईचे नाव विचारले, तेव्हा खानसाम्याने एका क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, ‘मैसूर पाक’ ! अश्या रीतीने त्या दिवशी या पक्वान्नाचा जन्म झाला. मैसूर पाक आजच्या काळामध्ये अनेक शहरांमधील मिठायांच्या दुकानामध्ये हा पदार्थ मिळत असला, तरी मैसूर येथील ‘गुरु स्वीट मार्ट’ माडाप्पाच्या वंशजांचे असून, केवळ येथेच मूळ पाककृतीनुसार बनविला गेलेला मैसूर पाक चाखण्यास मिळतो.

[ad_2]

Source link

Share this:

  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Telegram (Opens in new window)

Like this:

Like Loading...

Related

admin

admin

Next Post

जाणून घेऊ या लोणच्याचा रोचक इतिहास

ट्विटरवर फॉलो करा

ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि टाइम्स ऑफ मराठी वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

Join 23 other subscribers

फेसबुक पेज लाईक करा

ताज्या बातम्या

No Content Available
Load More
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

No Result
View All Result
  • Home
  • देश
    • दिल्ली
  • विदेश
  • ब्लॉग
  • महत्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • पुणे
    • नाशिक
    • मुंबई
    • औरंगाबाद
    • सोलापुर
    • अकोला
    • सातारा
    • नागपूर
    • कोल्हापुर
    • जळगाव
  • तंत्रज्ञान
  • रोचक तथ्य
  • मनोरंजन

© 2020 TOM Website Developement By Divesh Consultancy 9028927697

%d bloggers like this: