संशोधकांचा दावा; कोरोनाबाधिताचे प्राण वाचवू शकतो गांजा

Spread the love

[ad_1]


कॅनडा – सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाचा खात्मा करण्यासाठी कोणते औषध परिणामकारक ठरेल, यासंदर्भातील शोध जगभरातील संशोधक घेत आहे. याबद्दल सध्या जगातील १०० हून अधिक संस्थांमध्ये संशोधन सुरु आहे. असे असतानाच गांजाचा वापर करुन कोरोनाचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातील आणि गंभीर आजार असणाऱ्यांना वाचवता येऊ शकते, असा दावा कॅनडामधील एका विद्यापीठाने केला आहे. या संशोधनानुसार गांजाचे सेवन करणे शरीरामधील रोगप्रतिकारशक्ती आणखीन सक्षम करण्यासाठी फायद्याचे ठरते. गांजाचा अंश असणाऱ्या औषधांचा वापर कोरोना तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींवर करण्यास सुरुवात करता येईल, असेही या अभ्यास म्हटले आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार मानवी शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने शरीरामध्ये ‘साइटोकाइन स्टार्म’ नावाची प्रक्रिया सुरु होते. यामुळे शरीरामधील निरोगी पेशींवरही परिणाम होतो. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि इतर आजार असलेल्या अनेक रुग्णांचा याच कारणामुळे मृत्यू झाला असल्याचा कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांच्या एका गटाने दावा केला आहे.

गांजाच्या पानांमध्ये आढळणारे तत्व या साइटोकाइन स्टार्मला थांबवू शकते. साइटोकाइन स्टार्म निर्माण होण्यासाठी इंटरलुकीन-६ आणि ट्युमर नेसरोसीस फॅक्टर अल्फा ही दोन रसायने कारणीभूत असतात. याच रसायनांचे प्रमाण गांजामधील तत्वाच्या मदतीने कमी करता येते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

जगभरातील अनेक संशोधक कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच साइटोकाइन स्टार्मचा प्रभाव कमी करण्यासाठी काय करता येईल याबद्दल संशोधन करत होते. एखादा विषाणू शरीरामधून नष्ट करण्यात आल्यानंतरही ही प्रक्रिया सुरु असते. यामुळे अक्यूट रेस्पिरेट्री डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणजेच एआरडीएसचा त्रास होऊ शकतो. या एआरडीएसमुळे मृत्यूही ओढावू शकतो. यामुळे लंग फ्रायब्रेसिसचा त्रासही होऊ शकतो. लंग फ्रायब्रेसिसमध्ये फुफ्फुसांच्या पेशी खराब होऊन फुफ्फुसे निकामी होतात.

गांजामधील २०० वेगवेगळ्या स्ट्रेन्सचा कॅनडामधील लेथब्रिज विद्यापिठामधील संशोधकांनी अभ्यास केला. त्यापैकी सात स्ट्रेनवर त्यांनी सविस्तर संशोधन केले. ‘रिसर्च स्केयर’मध्ये हे संशोधन प्री-प्रिंट करण्यात आले आहे. यामध्ये तीन महत्वाचे स्ट्रेन संशोधकांना सापडले असून ते साइटोकाइन स्टार्मवर परिणामकारक ठरतील, असे सांगितले जात आहे. नंबर फोर, नंबर एट आणि नंबर फोर्टीन अशी नावे या स्ट्रेनला देण्यात आली आहेत. आता या स्ट्रेनचा वापर कोरोनाचा संसर्ग झाल्याने प्रकृती चिंताजनक असणाऱ्या आयसीयूमधील रुग्णांवर करण्याचा विचार केला जात आहे.

[ad_2]

Source link


Spread the love