सोनिया गांधींच्या भेटीनंतर नाना पटोलेंनी व्यक्त केला मोठा निर्धार

Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली – नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांनी नुकतीच दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. नाना पटोले यांनी या भेटीनंतर राज्यात काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण हे लक्ष्य २०२४ पर्यंत गाठणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

एएनआय या वृत्तसंस्थेशी दिल्लीत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी सोनियाजी आणि राहुलजी यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. महाराष्ट्रात पक्ष पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी माझ्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे लक्ष्य २०२४ पर्यंत पूर्ण करु, असा मला विश्वास आहे.

नाना पटोले यांनी २०१४ साली भंडारा-गोंदिया मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. पण पाच वर्षाच्या आतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर टीका करत पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. काँग्रेसकडून २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लढत त्यांनी विजय संपादित केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आले. महाआघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मागील अनेक दिवसांपासून काँग्रेस राज्यातील नेतृत्व बदलणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसने नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नावे स्पर्धेत होती. काँग्रेसमध्ये अनेक वरिष्ठ नेते असल्याने त्यांना सांभाळून घेणारे नेतृत्व निवडण्याचे आव्हान काँग्रेससमोर होते. विशेष म्हणजे एकेकाळी गढ असलेल्या विदर्भात काँग्रेस कुमकुवत झाली असून, पुन्हा पाय रोवण्यासाठी विदर्भाकडे प्रदेशाध्यक्षपद दिल्याचे बोलले जात आहे.

नाना पटोले यांच्यासोबत सहा कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहमद आरिफ नासीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे यांच्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसैन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. आय. नगराळे, शरद अहेर, एम.एम. शेख आणि माणिक जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link


Spread the love