स्पेशल सेलने लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी केली अभिनेता दीप सिद्धूला अटक

Spread the love

[ad_1]


नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 76 वा दिवस आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आज 26 जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला अटक केली. दिल्ली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. दीप सिद्धू लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात सहभागी होता.

दीप सिद्धूला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. 26 जानेवारीपासून मुख्य आरोपी दीप सिद्धू फरार होता. पण, दीप सोडून लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे गँगस्टर लक्खा सिधाना आणि जुगराज अद्याप बेपत्ता आहेत. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सुमारे 50 जणांचे फोटोही जारी केले आहेत.

धार्मिक झेंडा फडकवणे आणि लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस स्पेशल सेल करत आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथे ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.

[ad_2]

Source link


Spread the love