हे आहेत जगमान्य ठग! – Majha Paper

Spread the love

[ad_1]


जगामध्ये ठगांची, इतरांची फसवणूक करणाऱ्यांची कमतरता नाही. जा जगामध्ये एकापेक्षा एक वरचढ असे अनेक ठग होऊन गेले, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि चातुर्याच्या जोरावर अनेकांची फसवणूक केली. काही बहाद्दरांनी तर प्राचीनकालीन सरकारी इमारती देखील स्वतःची मालमत्ता असल्याचे भासवून त्यांची विक्री केली. या ठगांनी अमेरिकेतील ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ पासून ताजमहाल आणि दिल्लीचा लाल किल्ला देखील विकत असल्याचे भासवून लोकांना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे. अश्याच काही ठगांच्या बद्दल जाणून घेऊ या.

अमेरिकेचा रहिवासी असणारा फ्रँक एबग्नेल असा ठग होता, ज्याने बँकामधील अनेक चेक्सची हेराफेरी करून, अनेकांना कोट्यवधी रुपयांना फसविले. फ्रँकच्या अंगी कोणाचीही स्वाक्षरी हुबेहूब करण्याचे कसब होते. आपल्या या कसबाच्या जोरावर फ्रँकने तब्बल २६ निरनिराळ्या देशांमध्ये हे फसवणुकीचे व्यवहार केले. मात्र अखेरीस या महाठगाला पोलिसांनी अटक केलीच. चार्ल्स पोन्जी हा ठग मूळचा इटलीचा राहणारा होता. पण त्याने आपले संपूर्ण आयुष्य अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये घालविले. या देशातील अनेक गुंतवणूकदारांना ठगून त्याने कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. चार्ल्स अनकेदा पोलिसांच्या तावडीत सापडला देखील, मात्र स्वतःच्या चातुर्याच्या जोरावर तो लवकरच तुरुंगातून सुटत असे.

जॉर्ज सी पार्कर हा जगातील सर्वात चतुर ठगांपैकी एक होता. याने स्वतःची मालमत्ता भासवून अमेरिकेतील अनेक सरकारी इमारतींची राजरोस विक्री केली होती. अगदी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, grant tomb, मेडिसिन स्क्वेअर गार्डन, आणि मेट्रोपोलिटन आर्ट म्युझियम या ठिकाणांची देखील विक्री या बहाद्दराने केली होती. त्याला पकडण्याचे अनेक प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आले, मात्र दर वेळी तो पोलिसांना चकवून पळून जात असे. अखेरीस पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. नटवरलाल, उर्फ मिथिलेश कुमार याला भारतातील सर्वात चतुर ठग मानले गेले आहे. या मनुष्याने लोकांना अशी काही मोहिनी घातली, की त्याच्याकडून संसद भवन, आणि अगदी लाल किल्ला विकत घेण्यासाठी लोक तयार झाले. त्यापायी अनेकांना या पठ्ठ्याने कोट्यावधी रुपयांना गंडा घातला. अनेकदा अटक होऊनही दर वेळी पोलिसांच्या हातांवर तुरी देऊन हा फरार होत असे. १९९६ सालानंतर मिथिलेश जगाच्या पाठीवरून कुठे गायब झाला याची कल्पना आजतागायत कोणालाही नाही.

काही दशकांपूर्वी चेकोल्सोव्हाकीया देशाचा रहिवासी असणाऱ्या व्हिक्टरने चक्क पॅरीस येथील सुप्रसिद्ध आयफेल टॉवरच विकायला काढला होता. याला अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली होती. एलिझाबेथ बिग्ले उर्फ कॉझी चॅडविक ही अमेरिकेतील महिला ठग होती. अमेरिकेतील क्वीन्सलँड भागातील एकही बँक अशी नव्हती जिथे एलिझाबेथने फसवणुकीचे व्यवहार केले नाहीत. ही महिला बँकांकडून भली मोठी रक्कम कर्ज म्हणून घेत असे, आणि त्यानंतर गायब होत असे. त्याकाळचे मोठे उद्योगपती अँड्र्यू कॉरनेगी यांची आपण मुलगी असल्याची बतावणी करीत एलिझाबेथ बँकांकडून कर्ज घेत असे. अखेरीस या महिलेला अटक करण्यात आल्यानंतर खरा प्रकार उघडकीला आला.

[ad_2]

Source link


Spread the love