१ रुपयात भुकेलेल्यांचे पोट भरणार गौतम गंभीर

[ad_1]


नवी दिल्ली – कोरोना संकटात भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि विद्यमान भाजप खासदार गौतम गंभीरने अनेक समाजकार्य केली. त्याने आपला खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी दिला होता. त्याचबरोबर स्थलांतरीत मजूरांनाही त्याने गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून भरभरून मदत केली. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या काळात त्याने तृतीय पंथीयांनाही रेशन पुरवले. गंभीरने आता आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याच्या पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी ‘जन रसोई’ सुरू केली आहे.

त्याने गुरुवारी गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे उद्घाटन केल्यानंतर अशोक नगर येथे दुसरी कँटिन सुरू केली जाणार असल्याचे त्याच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवे आणि तो प्रत्येकाचा हक्कच असल्याचे मला वाटते. दोन वेळचे जेवणही बेघर आणि निराधार लोकांना मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटत असल्याचे गंभीर म्हणाला.

त्यामुळे जन रसोई कँटिन पूर्व दिल्लीतील दहा विधानसभा मतदारसंघात सुरू करण्याचा विचार गंभीर करत आहे. गांधी नगरमध्ये देशातील सर्वात मोठे होलसेल गार्मेंट मार्केट आहे आणि तेथे जन रसोई कँटिन उघडण्यात आली आहे. येथे १ रुपयांत जेवण दिले जाणार असल्याचे गंभीरच्या कार्यालयाने सांगितलेल्या निवेदनात म्हटले आहे. या कँटिनची क्षमता १०० माणसांची आहे, परंतु कोरोना नियमांमुळे एका वेळी ५० लोकांनाच येथे येता येणार आहे. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी असा आहार असणार आहे. स्वतःच्या खिशातून आणि गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा खर्च गौतम गंभीर उचलणार असून तो त्यासाठी सरकारची मदत घेणार नाही.

[ad_2]

Source link

Share

You may also like...

%d bloggers like this: