१०८६ श्रमिक विशेष रेल्वेने जबलपुरकडे रवाना

0
7

अकोला, दि.७ (जिमाका) : अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यातील १०८६ स्थलांतरीत श्रमिक मजूर आज विशेष रेल्वेगाडीने अकोला येथून जबलपूरकडे रवाना झाले. आज रात्री आठ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदिल दाखवून ही गाडी रवाना केली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या समवेत पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अमरावती येथील उपायुक्त प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे, रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक अकोला मो.यस्मिन अन्सारी आदी उपस्थित होते. यावेळी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाडी न ०१९२० या गाडीने हे श्रमिक रवाना झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील १६०, अमरावती जिल्ह्यातील ३३६, वाशीम जिल्ह्यातील ४४, बुलडाणा जिल्ह्यातील २४३ व यवतमाळ येथील ३०३ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना प्रशासनातर्फे जेवण, पाणी पुरविण्यात आले.

उद्या शुक्रवार दि. ८ रोजी अकोला ते भोपाल या मार्गावर दुसरी श्रमिक रेल्वे जाणार असून ही गाडी अकोला येथून रात्री साडेआठ वाजता रवाना होणार आहे. या गाडीतही अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम येथील परप्रांतिय श्रमिकांचा समावेश असेल, असे नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here