16 वर्षाच्या अल्पवयीन दलित मुलींवर 10 जणांनी बलात्कार केला आहे

सोलापूर, विजापूर ठाणा पोलीस स्टेशन हद्दीत 16 वर्षाच्या अल्पवयीन दलित मुलींवर 10 जणांनी बलात्कार केला आहे. बलात्काराचा व अट्रोसिटी ऍक्टचा गुन्हा आतिपिंवर दाखल झाला असून 5 आरोपी अटक करण्यात आले आहे. उर्वरित आरोपीना तात्काळ अटक झाली पाहिजे. ही घटना मानवतेला पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रात सध्या महिला अत्याचार हा राष्ट्रीय आपत्ती सारखा मोठा प्रश्न झाला आहे. सरकारने महिला अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली पाहिजे. एका पाटोपाट एक घटना घडत असून सरकार उदासीन आहे. सोलापूरच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे हिंगणघाट आरोपीच एन्काऊंटर करा म्हणतात परंतु सिल्लोड प्रकरण, सोलापूर प्रकरणी त्या गप्प असतात. सगळेच अत्याचार हे अत्याचार आहेत हे ईथल्या राज्यकर्त्यांनी समजून घेऊन यावर एक ठोस भूमिका घेतली पाहिजे. बेटी बचाव हे फक्त अभियान झालं आहे. बेटी मिटाव सुरू आहे. सरकार उदासीन का आहे हा सर्वात मोठा प्रश्न आहे?

सोलापूर विजापूर बलात्कारातील आरोपींना तात्काळ अटक करा, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मुलीला न्याय मिळालाच पाहिजे तिचे पुनर्वशन झालंच पाहिजे. महाराष्ट्रातील महिला अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेना करत असून घटनेचा जाहीर निषेध करत आहे!

– दिपक केदार

राष्ट्रीय अध्यक्ष

ऑल इंडिया पँथर सेना

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: