मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज मुलुंड, दहिसर, महालक्ष्मी रेसकोर्स व BKC या ठिकाणी मिळून उभारण्यात आलेल्या विविध कोरोना आरोग्य केंद्रातील एकूण ३५२० रुग्णशय्यांचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लोकार्पण करण्यात आले. हे बेड्स कोरोना बाधितांवर उपचारासाठी उपलब्ध होणार आहे.
–
मुलुंड येथे १,७०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र सिडकोच्या पुढाकाराने उभारण्यात आले आहे. दहिसर (पू) येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने ९०० खाटांचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र तर दहिसर (प) येथे १०८ ICU बेडची सुविधा उपलब्ध असलेले समर्पित कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे.
–
महालक्ष्मी रेसकोर्स येथे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र उभारण्यात आले असून तेथे ७०० रुग्णशय्या उपलब्ध आहेत. तर BKC येथे MMRDA यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील समर्पित कोरोना आरोग्य केंद्रात ११२ रुग्णशय्या अतिदक्षता उपचार करण्यासाठी असतील.
–
यावेळी वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख, पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
इथे ही वाचा
जर चिनी सैन्याने घुसखोरी केलीच नाही, तर आता माघारी का जात आहात …
“आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप!”
शिवसेनेचे नगरसेवक फोडणाऱ्या राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पत्नी मात्र अजूनही शिवसेनेत!