मुंबई | मुंबईमध्ये 19 वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात समोर आली आहे. सध्या लोकांची माणसिकता किती खालच्या थराला गेली आहे यावरून लक्षात येतं.
बॉलिवूडमध्ये काम शोधण्यासाठी हा संबंधित तरूण गुजरातहून मुंबईत आला होता. तो आपल्या नातेवाईकांकडे रहात होता. त्यानंतर सोशल माध्यमावर या तरूणाची पुनिक शुक्ला या आरोपीशी झाली. तुला काम देतो असं सांगत आरोपीने तरूणाला बोलावलं होतं. पहिल्या भेटीत त्यांची चांगली ओळख झाली
आरोपीने तरूणाला आपल्या मित्रांशी ओळख करून देतो असं सांगितलं आणि पुन्हा भेटायला बोलावलं. शुक्ला एका मित्रासोबत एका तरूणाला भेटला आणि आणखी दोघांना भेटवण्यासाठी त्यांनी तरूणाला एका निर्जनस्थळी असणाऱ्या इमारतीवरील गच्चीवर नेलं आणि त्याच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, तरूण तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला नराधमांनी काठीने आणि लाथाबुक्यांनी मारलं. तरूणाचा व्हिडीओही त्यांनी बनवला. मुलाचा फोन आणि पाकीटही काढून फेकून दिलं. तरूणाने सर्व प्रकार घरी सांगत पुढे पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. याबाबत मिड डेने वृत्त दिलं आहे.