20 लाख रुपयांचे 4 हजार कुटुंबाची चूल पेटवणारे भीमसैनिक सुधाकर निकाळजे

0
6

आंबेडकरी चळवळीतील भीमवाडीचा प्रवासी : सुधाकरभाई निकाळजे :- देवानंद पवार यांचा ब्लॉग

कोरोना योद्धा कोविड -19

● सुधाकरभाई निकाळजे ●

लोकनेता….
सुधाकरभाई निकाळजे!
गावापासून शहरांपर्यंत…..
आवाजाला आवाज देणारा माणूस,
एक झंझावात परिवर्तनाच्या प्रवाहातला,
समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधूभाव जपणारा,
कणखर, निर्भिड, गुलामगिरीला घाम फोडणारा
दिन दुबळ्यांचा सहारा सुधाकरभाई निकाळजे,
रस्त्यावरची लढाई रस्त्यावर लढणारा पँथर
मोर्चा निदर्शने, रास्तारोको बंद म्हणजे बंद म्हणणारा आंबेडकरी चळवळीची मुलुख मैदानी तोफ
समाजाच्या अतंर्मनातील नेता ते कार्यकर्ता
अन्याय अत्याचारा विरूद्ध पेटून उठणारा बाप माणूस
एक कॉल मॅटर स्वॉलची धमक…
आंबेडकरी राजगृहाचा सच्चा पाईक
एक भीम सैनिक बहुजनांसाठी पेटून उठणारा
मोडेन पण वाकणार नाही व्यवस्थेपुढे झुकणार नाही,
भांडवल शाहीला ठोस देऊन कामगारांना न्याय देणारा मोल मजुर,कामगार दिन दुबळ्यांचा दाता,
भागो नहीं दुनिया बदलो म्हणणारा माणूस
महामारीच्या काळात कसा शांत बसणार?
कोरोना कोविड-19 चा गंभीर प्रश्‍न…
लॉकडाऊन झालेलं अख्यं जग पाहुन
गहिवरलेला हुंदका हृदयात दाबुन,
आता आपण घरात बसून कसं चालायचं ?
आणि मायेचा पाझर फुटला आपल्या माणसांसाठी दिलदार, दमदार सुधाकरभाई निकाळजे पेटून उठला, भुकेल्यांची भुक मिटविण्यासाठी….
निराधार झालेल्या माणसांचा टोहो कानी येत असतांना माणसं वाचली पाहीजेत हा त्यांचा प्रश्‍न
शासनाचे नियम पाळून शासनाला सहकार्य करून
फक्त माणसं वाचविण्यासाठी भाईंची धडपड
घरातच रहा म्हणणारे सरकार ऽऽऽ
गोर गरिबांच्या घरातील चुल नाही पेटवू शकले.
म्हणून भाईच झाला अंगार गरिबांच्या चुलीपेटविण्यासाठी आणि सुरू झाली चळवळ कोरोना कोविड – 19 ची
गाव, शहरे ओस पडली…
मॉल, किराणा दुकाने, कारखाना सर्वच बंद झाले.
अन्न निवार्‍यांचा सहारा गेला,
कास्तकार्‍यांची आणि कष्टकर्‍यांची हातं थांबली,
रस्ते सुनसान झाली, सर्वच वातावरण स्तब्ध झाले. कोणीच कुणाला बोलत नाही, कोणीच कुणाला स्पर्श करीत नाही, तोंडाला मुचके बांधून फिरणारी माणसं
टाहो फोडत आहेत, भुकेच्या आतांकाने…
घरातल्या घरात रडत आहेत माय बापुडे
आपल्याच माणसांची प्रेते दिसत आहेत सगळीकडे
सर्वच रस्ते लॉक करून…
चौका-चौकात पोलीसांचा ताफा आहे.
नाक्या नाक्यावर केलेल्या बंदिस्तीने…
वाटसरू घाबरून गेला, त्याने ही रस्ता बदलला,
शहराने तोंड झाकले, काफीला निघालाय मायभूमीकडे रक्ताळलेल्या पावलांनी रस्ते ही लाल झाले.
मुरगळलेल्या वाटेत पाणी ही पाजायला कुणी नाही. शेजारचा जवळ येऊ देत नाही,
इथं माणूस ही माणसाला बोलत नाही.
कोरोना रोगाच्या धास्तीने…
कधी न येणारा आवाज घोंघावत आहे.
हतबल झालेल्या माणसांसह पक्षांची कीलबील,
ढोर वासरांचा आवाज कोण रोखणार?
सर्व आसमंत सुनसान झालं…
पोलीस, डॉक्टर मायबाप हतबल झाले.
सॅनिटायझरची फवारणी करून,
आता कोणीच कोणाला बोलू नये,
आता कोणीच कोणाला स्पर्श करून नये,
एवढी कोरोना मुळे महामारीची दहशत वाढली.
पण… जिगरबाज सुधाकरभाई निकाळजे !
मरण खिशात घेऊन फिरत असतांना …..
शासनाला ही लाजवेल असा सरकार झाला,
भुकेल्यांच्या घराघरातील चुली पेटविण्यासाठी गोरगरिबांच्या टाहोंचा आवाज येताच भाई धावत होते. वाडी, तांड्यावर जात होते, फक्त बोलण्यासाठी नाही
तर भुकेल्यांची भुक मिटविण्यासाठी…
सकाळीच आपली गाडी काढायची ऽऽऽ
रोहीदास गंगातिवरे सह चार -पाच मित्र घ्यायचे सोबतीला आणि स्वतः बनविलेली राशन किट द्यायची,
घरोघरी जाऊन फक्त माणसं वाचविण्यासाठी
राशन किट काय असते?
तर माणसाला जिवनावश्यक असलेल्या वस्तू.
दाळ दाना, गुहु, ज्वारी, तांदूळ, तेल, साखर, साबन, हळद, मिरची मीठ, भाजीपालासह औषधी,
माणसाने घरातच रहावे म्हणून त्यांची धडपड
घरातच रहा, घरातच बसा, पण आपला जिव वाचवा
पण बहाद्दुर सुधाकर भाई निकाळजे….
स्वतःच्या जिवाची पर्वा न करता –
दुसर्‍यांचे जिव वाचविण्यात धडपडत आहेत.
मॉल, किराणा दुकान, बंद असतांना काय करणार?
सम्राट फॉर्म हाऊसवर असलेल्या माणसाची चर्चा
आपला देश, आपला समाज, आपला माणूस जगला पाहीजे
म्हणूनच भाईंनी खुले केले स्वतःचे घर, दार आणि शेत काबाड कष्ट करून शेतातील माल शेतातच दान केला. पन्नास क्विंटल गहु, तिस क्विंटल ज्वारी
आणि जनावरांना लागणारा चारा…
भुकेने व्याकुळ झालेल्या माणसांना देऊन टाकले,
हा बळीराजा आहे आधुनिक युगातला…
माणसाला पाणी न पाजणारी माणसं समाजात आहेत.
या बहाद्दराने आपला अख्खा समुद्र दान केला
पोटाच्या भुकेची आग लवकर पेट घेते…
ही आग विझविण्याचं काम भाई तुम्ही केले.
सांगता येत नाही कसं सांगावं?
अस्सल काळीज लागते दान करण्यासाठी
आपल्या देशातील गब्बर माणसं हसतात.
या महामारीच्या काळातही…
माणसं उपासी झोपत असतांना
ते श्रीमंतीला कवटाळतात,
त्यांच्या मड्यावर केव्हाचीच श्रीमंती बांधून दिली निसर्गाने भाई मड्याला सुद्धा सजविण्याचं काम करतात.
फक्त आपली माणसं वाचली पाहीजे म्हणून…
शेवटी माणूस, माणूस असतो मीत्रा!
माणसं जगविली पाहीजे, माणसं जोडली पाहीजे, म्हणूनच सुधाकर भाई निकाळजे…
धावून येतात सर्व समाजाच्या बांधावर
याच महामारीच्या काळात आमची भीमजयंती आली.
एकशे एकोणतीसावी भीमजयंतीचा उत्सव कसा करायचा?
बाबासाहेबांप्रती असलेली कृतध्नता कशी व्यक्त करायची समाजात कोरोनामुळे आलेली कटुता कशी घालायची भाईंनी शक्कल लढविली
आपल्या राजाची जयंती गोडकरायची
आणि सुरूवात झाली 129 वी जयंती 129 क्विंटल साखर वाटून
अख्खा आसमंत गोड करून टाकला भिमजयंतीला म्हणूनच मी भाईला सविनय जयभीम करतो…
बाळासाहेबांचा ही वाढदिवस भाईंनी असाच गोड केला. अश्या ह्या राजगृहाच्या सेवकाला मी सलाम करतो.
भाई आंबेडकरी विचारांचं रसायन आहे.
म्हणूनच समाजमनात आज त्यांचा सन्मान आहे.
आज ही भाईंना मदतीचे कॉल, पत्र येतात…
आणि भाई हजर होतो… त्यांच्या गहीवरल्या आवाजांवर कवी, गायक, पत्रकार, लेखक, समाजसेवक आणि तृतियपंथी यांच्याही जगण्याचा ते सहारा झाले महामारीच्या काळात
खरोखरच भाई आपण माणूस आहात माणसांसाठी कोरोना व्हायरस कोविड – 19 चा अपण योद्धा आहात आपल्या हातून घडलेलं कार्य देशाच्या हीतासाठी आहे. आपण खरोखरच देशभक्त असून
भीमवाडीचा प्रवासी आहात.
माणसं वाचिण्याची आपली चळवळ…
आम्ही गोंदवून ठेवली आमच्या काळजावर…
हे कोरोना महायोद्धा ….
तूला सलाम! सलाम!! सलाम!!!

■ – देवानंद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here