५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु

0
4

५५ वर्षांवरील पोलिसांना घरीच राहण्याचे आदेश, पगार राहणार सुरु

करोना महामारीच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलीसांमधील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली, अनेकांचे यात मृत्यूही झाले. या पार्श्वभूमीवर ५० ते ५५ वयोगटातील पोलिसांना सॉफ्ट ड्युटीज देण्यात आल्या आहेत. तर ५५ वर्षांवरील १२ हजार पोलिसांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या काळात त्यांचा पगारही सुरु राहणार आहे. दरम्यान, पोलिसांना करोनावर उपचारांसाठी गरज पडल्यास १ लाख रुपयांपर्यंत अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेंतर्गत त्यांना कुठल्याही रुग्णालयात मोफत उपचारही घेता येतील, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पुण्यात येरवडा येथील कोविड रुग्णालयाला त्यांनी भेट दिली यावेळी माध्यमांशी ते बोलत होते.

सौजन्य :- लोकसत्ता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here