धक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास

2
6

धक्कादायक -विधी महाविद्यालयातिल ९०% विद्यार्थ्यांना केले नापास.
मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
मालेगाव-
येथिल कर्मवीर भाऊसाहेब विधी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नुकताच प्रथम व द्वितीय सत्राचा निकाल लागला . त्यात ९०% विद्यार्थी नापास केले आहेत.अंतर्गत मूल्यमापन तसेच सेमिस्टर परीक्षा( INTERNAL & EXTERNAL) मध्ये दिलेल्या मार्क्स ला विद्यार्थ्यांनी हरकत घेतली आहे, तसेच कॉलेजने केलेल्या मूल्यांकन वर शंका व्यक्त केली आहे.
त्यानंतर विद्यार्थ्यांची विनंती आहे की मिळालेल्या गुणाचे पुनरमूल्याकंन व्हावे, विद्यापीठा मार्फत पेपरची फेर तपासणी करण्यात यावी.
कोविड-१९ च्या प्रभावा मुळे शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार विधी अभ्यासक्रम (LLB ) च्या पहिल्या वर्षाच्या प्रथम सेमिस्टर च्या ५०% व दुसऱ्या सत्राच्या अंतर्गत मूल्यमापन यांची सरासरी घेऊन दुसऱ्या सेमिस्टर ला देण्यात यावेअसे आदेश असताना कॉलेजने विद्यार्थ्यांना अंतर्गत गुणही समधनकारक दिले नाहीत .
कोरोनासारख्या आपत्ती काळात आधीच विद्यार्थी खूप संकटात आणि नैराषेत सापडले आहेत. त्यात अशी अनियमितता झाल्यामुळं विद्यार्थ्यांना अजून संकटात सापडले आहेत .
या अनुषंगाने उत्तरपत्रिका ची फ़ोटोकॉपी तसेच पुनर्रमूल्यांकन करून विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती एक निवेदनाद्वारे प्राचार्य ,कुलगुरु तसेच शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे .
या संदर्भात नॅशनल स्टुडंट्स युनियन ने कॉलेज प्रशासनास जाब विचारला असता आम्हीं फ़ोटोकॉपी व पुनरमूल्यांकन करू असे उपप्राचार्य शंकर कदम यांनी संघटनेशी बोलताना सांगितले परंतु विद्यार्थ्यांनि प्राध्यापकाना विचारले असता आम्ही विद्यापीठाकडे गुण पाठवले असल्याने कुठलाही बदल करणार नाही अशी भूमिका घेतली .
त्यानंतर नॅशनल स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष दादाराव नांगरे यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे चे कुलगुरु व परीक्षा संचालक याना यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे
इथे हि वाचा
ठाण्यात रुग्णालयांचा अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू

विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही – शिक्षण विभाग

केईएम’मधून 70 वर्षीय कोरोनाबाधित बेपत्ता, 10 दिवसानंतरही शोध लागेना