maharashtra

विषय – वाहतूक सुरक्षा निमित्त.

दिनांक 19/10/2022
स्थल-मंगलम हॉल ,पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव
संदर्भ – जळगाव शहरातील रिक्षचालक- मालक या समूहावर होणाऱ्या अडचणी व कायदेशीर नियमांचे पालन अशा विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व रिक्षाचालक व जनसामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यातला समतोल राखण्यासाठी वीर सावरकर रिक्षा युनियन व परिवहन विभाग – वाहतूक शाखा यांच्यामार्फत सुरक्षा सप्ताह राबिण्यात आला आणि मोठ्या जमाव संख्येने यशस्वी करण्यात आला.
जनजागृती करण्यासाठी रिक्षा सारखे माध्यम खूप महत्वाचे आहे
आणि जनसामान्यांचा फसवणूक होणार नाही आणि प्रामाणिक रिक्षा चालकांवर अन्याय होणार नाही या अनुषगाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.
आता रिक्षा चालकांची रिक्षामध्ये माहिती असणार त्यामुळे प्रवासी वाहतूक मधील होणारे गैरसमज दुरुस्त होईल तसेच माहिती पुढीलप्रमाणे –
वाहन परवाना धारक माहिती
१) वाहन क्रमांक –
२) परवाना धारक नाव –
३) चालकाचे नाव –
कार्यक्रम प्रसंगी मोटर वाहन निरीक्षक श्री श्याम लोही यांनी नियमावली सांगितली व रिक्षाचालकांना मार्गदर्शन केले .
तसेच रिक्षा युनियन जिल्हाध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांनी देखील वाहतूक जनजागृती राबवून रिक्षा चालकांना प्रवासी वाहतूक करताना होणारा नाहक त्रास व जनसामान्य नागरिक समस्या या सस्येबाबत निवारण करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबविले आहे व मोलाचे मार्गदर्शन केले , कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर पुढीलप्रमाणे -पदमसिद्ध ऑटो संचालक संजय खैरनार, रज्जाकभाई, सहा.मोटार वाहन निरीक्षक ऋषिकेश महाले,मोरेश्वर साखरे,निलेश झाडे सूत्र संचालन श्रीमती सुनीता मराठे यांनी केले यावेळेस शहर वाहतूक शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक
ASI सैय्यद मुजफ्फर अली प्रशिक्षक शहर वाहतुक शाखा
महीला पोलीस मेघना जोशी वाहतुक शाखा जळगाव, , कार्यक्रम यशस्वितेसाठी
वीर सावरकर रिक्षा युनियन मार्फत परिश्रम घेण्यात आले.
पदाधिकारी व सदस्य – पोपट ढोबळे,कैलास विसपुते, पिंटू भोस, वाल्मीक सपकाळे,अशोक चौधरी, एकनाथ बारी, शशी जाधव ,विलास ठाकूर,बहुसंख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button