political

शिंदे सरकार राहणार की जाणार? आज महत्वाची सुनावणी

राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आज ही सुनावणी होणार आहे.

शेवटची सुनावणी २७ सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात अनेक सुट्ट्या आल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी आज होईल, असं सांगण्यात आलं.सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्ष काय बाजू मांडतील, याकडे लक्ष लागलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत पहिल्याच क्रमांकावर हे प्रकरण असणार आहे. या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button