maharashtra

बोलो भारत माता की जय! वंदे मातरम!

अक्कलकोट दि. १ (प्रतिनिधि)
बोलो भारत माता की जय! वंदे मातरम!शक्ती पिठ हवा मल्लिनाथ महाराज की जय चा जय घोष करीत करजगी हंद्राळ रस्त्यावरील मुचंडे यांच्या शेतात सदगुरु हवा मल्लिनाथ महाराज यांच्या अमृत हस्ते ऐतिहासिक शक्ती पिठ देवी मूर्ती स्थापना करून देशभक्ती कर्यक्रम शिव भक्तांनी जल्लोषात साजरी केली.

जय भारत माता सेवा समिती दिल्ली (रजी.) राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात दीपावलीच्या लक्ष्मी पूजन दिवशी सोमवार दि.२४ रोजी अक्कलकोट तालुक्यातील करजगी हंद्राळ रस्त्यावरील मुचंडे यांच्या शेतात ऐतिहासिक शक्ती पिठ देवी मूर्ती स्थापना केली आहे.

सुरेश मुचंडे हे अक्कलकोट तालुक्यातील करजगीचे सुपुत्र आहे. कलबुर्गी येथे हल्ली राहणार असून आपले मालकीचे पाच एकर शेत जमीन शक्ती पिठ देवी मूर्ती स्थापन करण्यासाठी दान दिली आहे.
संसाराच्या व्यापातून थोडाकाळ विश्रांती मिळावा आणि भक्ताने आपले जिवन सार्थक करून शिव भक्तीतून देश भक्ती मार्गाकडे वळावे, या प्रमुख उद्देशाने सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजांनी आंध्रा,तेलंगण,कर्नाटका, महाराष्ट्र, अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे साडेपाच हजारोहून अधिक शिवलिंगाची स्थापना केले आहेत.
शक्ती पिठ देवी मूर्ती स्थपना यात्रेस इंडी,

अफजलपुर,आंळद,सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील  भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.यामुळे मूचंडे परिवार आणि यात्रा कमिटीचे वतीने यात्रेची जयत्त तयारी करण्यात आले होते. रवीवार दि.२३ रोजी रात्रौ देशभक्ती गीत भजन भारुड इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. सोमवार दि.२४ रोजी पहाटे श्री चे महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन  इत्यादी कार्यक्रम झाला असून पहाटे सहा वाजता श्रीचे भव्य मूर्ती विविध वाद्य समवेत स्थापना करण्यात आला. यानंतर भक्ताचा राजा सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजाचा दर्शन आणि महाप्रसाद लाभ घेवून भाविक भक्तांनी आनंद उत्सव जल्लोषात साजरी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button