वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल

सातारा | वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती शिवरायांचे वारसदार खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याविरोधात मराठा क्रांती मोर्चाने दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषेदत छत्रपतींचे वारस असलेल्या राजांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर येथे आंबेडकर यांचा निषेध करण्यासाठी अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान, शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाचे भागवत कदम यांनी केलेल्या तक्रारीवरुन अॅड. आंबेडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: