खळबळजनक! नालासोपाऱ्यात घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला उचलून तिच्यावर बलात्कार

मुंबई | घराबाहेर पाण्याचा पाईप लावण्यासाठी गेलेल्या मुलीला नराधमांनी जबरदस्तीने उचलून नेलं. एका मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या टेम्पोत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.

जीवे मारण्याची धमकी देऊन 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. या बलात्काराच्या घटनेनं नालासोपारा हादरलं आहे.

मुलीच्या आरडाओरड्यामुळे ही घटना उघडकीस आली. मात्र तोपर्यंत बलात्कार करून आरोपी फरार झाले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी 8 जानेवारीला रात्री 9 च्या सुमारास घडली.

दरम्यान, याप्रकरणी वसईतील वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसापासून बलात्कारासारख्या घटनांचं सत्र वाढलं आहे.

Share

You may also like...

%d bloggers like this: