कानपूर | कानपूर रेल्वे स्टेशनमध्ये थांबलेल्या स्वातंत्र्या सेनानी एक्सप्रेसच्या पॅट्री कारमध्ये एक बेवारस बॅग असल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली होती. बेवारस बॅग म्हटलं की बॉम्ब असण्याची शक्यता असं नेहमीच गृहीत धरलं जातं. या बॅगेचीही त्याच अनुशंगाने तपासणी करण्यात आली. तर बॉम्ब सोडा या बॅगमध्ये चक्क करोडो रुपयांची रोकड असल्याचं समोर आलं. या प्रकारामुळे रेल्वे खात्यातील अधिकाऱ्यांसह जीआरपी आणि आरपीएफच्या जवानांचे डोळे पांढरे झालेले पहायला मिळाले.
जप्त केलेल्या लाल रंगाच्या या बॅगमध्ये दोन हजार, पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा आहेत, त्यामुळे ही बॅग हवाला व्यवसायकाची असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या रकमेने भरलेली ही बॅग सध्या आयकर विभागाच्या हवाली करण्यात आली आहे.
रेल्वेचे उप सीटीएम हिमांशु उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये सापडलेली ही बेवारस बॅग आरपी आणि आरपीएफच्या उपस्थितीत उघडण्यात आली असून बॅग उघडताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता. पैश्यांची मोजणी केल्यानंतर 1 कोटी 40 लाख रुपये असल्याचे समोर आले.
या घटनेची संपूर्ण माहिती आयकर अधिकाऱ्यांसोबतच रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनासुद्धा देण्यात आली आहे. तसेच पैश्यांनी भरलेली ही बॅग पोलिस संरक्षणाखाली ठेवण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी निरीक्षक जीआरपी राममोहन राॅय यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बॅग उघडली गेली असून नोटांची मोजणी करताना छायाचित्रणही केले गेले आहे, ज्यामुळे रेकाॅर्ड ठेवता येतील, असं सुद्धा राममोहन राॅय यांनी सांगितलं आहे.
इथे हि वाचा
धक्कादायक! तृतीयपंथीयांनी वाहतूक पोलिसाला मारहाण करत गणवेशही फाडला
आज ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे भाव…
‘या’ बॅंकांमध्ये तुमची खाती तर नाहीत ना?; ‘या’ चार बँकेचं होतयं खाजगीकरण