मुंबई | आपला मुलगा घरात सतत पैसे मागतो म्हणून एका आईने धक्कादायक पाऊल उचललं आहे. ठाण्यातील चिराग नगरमध्ये ही घटना घडली आहे. आईने आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केली आहे.
पोलिसांनी आईला आणि मोठ्या मुलाला अटक केली असून 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोसिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने आणि मोठ्या मुलाने हत्येचा कट रचला आणि 7 जानेवारीला लहान मुलाची धारदार शस्त्राने हत्या केली आहे.
हत्या केल्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करायचा म्हणून मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये भरला आणि वाहनाने कसारा घाटात फेकून दिला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आईने पोलिसांन फोन करत मृतदेह कसारा घाटात सापाडल्याचं सांगितलं. मुलाच्या फोनवर फोन आला त्यानंतर मोठ्या मुलासोबत कसारा घाटात आम्ही गेलो होतो. त्यानंतर पोलिसांना आईवर आणि मोठ्या मुलावर संशय आला. त्यांनी पद्धतीने दोघांची चौकशी केली व दोघांनीही गुन्हा कबूल केला.
दरम्यान, तो काही काम करत नव्हता आणि सारखा पैसे मागायचा नाही दिले तर मारहाण करण्याची धमकी देत असल्याचं आईने सांगितलं. पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे.