ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सोलापूर दौरा,शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा सोलापूर दौरा,शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

सोलापूर, दि. २० – परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यात अनेक गावांत नदीचे पाणी शिरले तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. अक्कलकोट मधील सांखवी या गावाला त्यांनी भेट दिली. परतीच्या पावसामुळे सोलापुरातील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी स्तरावर मंत्र्यांचे दौरे सुरू असून मदत मात्र कोणत्याही शेतकऱ्यांना मिळालेली नाही, काहीना मदतीच्या नावावर चार हजार रुपयांचे धनादेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. आज या सर्वांनी बाळासाहेबांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: