तुमच्याही मनाला पाझर फुटेल.. आणि सत्य कळेल..आणि आंबेडकर घरान्याकडे आपोआपच तुमची पाऊले वळू लागतील

तुमच्याही मनाला पाझर फुटेल.. आणि सत्य कळेल..आणि आंबेडकर घरान्याकडे आपोआपच तुमची पाऊले वळू लागतील….

बुलडाणा येथिल एका शेतकऱ्याचे मनोगत
जेव्हा अदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबानी 1984 मध्ये शेतकऱ्यांसाठी व औरंगाबाद विद्यापिठाच्या नामांतर लढ्यासाठी सहा दिवसाचा नाशिक ते मुंबई असा भव्य लाँगमार्च काढला होता .तेव्हा या या मोर्चा मध्ये अडीच लाखापेक्षा जास्त लोक सहभागी झालेले होते ..
मोर्चाने गती पकडलेली होती..सर्व जातीचे लोक बाळासाहेबांच्या नावाने घोषणा देत होते…..
लोक रस्त्याने चालत होते..या मोर्च्यामध्ये बुलडान्याचा एक शेतकरी होता तो बुलडाणा येथून पाई पाई अनुवानी पायाने बाळासाहेबांच्या हाकेला हाक देऊन आलेला होता..उन्हाने तापलेले डांबरी रोडवर चालताना त्याच्या पायाला अक्षरशः फोड येऊन फुटले होते..पायातून भळाभळा रक्त गळत होते…त्या डांबरी रोडवर त्याच्या रक्ताने माखलेल्या पायाचे ठसे उमटत होते….ते रक्ताचे ठसे एक दिवस बाळासाहेबांचही सरकार येईल असाच इशारा देत होते …( आणि आता तिच वेळ आलीय)
तो शेतकरी लंगडत लंगडत चालत होता ..पायाला वेदना होत होत्या …पण त्याचा जोश कमी होत नव्हता या शेतकऱ्याचे वय साठ वर्षाच्या वर होते तरीही हा शेतकरी तरुण पोराच्याही पुढे चालायचा…..त्याच्या पायातून रक्त निघत आहे ही गोष्ट एका कार्यकर्त्याच्या लक्षात आली..त्या कार्यकर्याने त्या बाबाला बसचे तिकिट काढून देतो ..तुमच्या पायाला तकलिप आहे तुम्हांला खूप त्रास होत आहे त्यामुळे तुम्ही येथूनच परत जा अशी विनंती केली ..तरी तो शेतकरी ऐकत नव्हता..

शेवटी त्या कार्यकर्त्याने ही गोष्ट बाळासाहेब आंबेडकराना सांगीतली ..बाळासाहेब त्या शेतकऱ्यांजवळ आले तेवढयात तो शेतकरी बाळासाहेबांच्या पायावर झुकणार एवढ्यात साहेबानी त्याला वरतीच उचलून धरले ..त्याच्या जवळ बसले .पाठीवर प्रेमाने हात ठेवला आणि बघीतल तर चालून चालून त्याच्या पायाला मोठ्या भेगा पडलेल्या..त्यातून रक्त पाझरत होत…बाळासाहेबानी कार्यकर्त्यांना विचारल कुणाकडे प्रथमोपचार साहीत्य आहे का ..त्याच्या पायाला स्वतः साहेबानी बँडेज बांधल ..व
त्या शेतकऱ्यांला सांगितलं कि बाबा तुम्ही आता घरी जा…अशी प्रेमळ विनंती केली…” परंतु तो शेतकरी विजेसारखा कडाडला आणि साहेबाना म्हणाला ..साहेब तुम्ही बाबासाहेबांच नातू आहात…तुम्ही स्वतः जर नाशिक पासून मुंबई पर्यंत या तापलेल्या डांबरी रोडने आमच्या साठी चालत असाल ..तर मग तुमच्यासाठी माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुम्हाला अडवाटेत सोडून जाणारं नाही…..
आणि तो शेतकरी ढसा ढसा रडू लागला….त्या शेतकऱ्यांची श्रद्धा बघून बाळासाहेबानाही राहवल नाही ते सुद्धा रडू लागले…
सोबतचे कार्यकर्तेही रडत होते…
आणि मोर्चा पुन्हा त्याच गतीने चालू लागला,.
तात्पर्य अस कि बघा बांधवानो बाळासाहेबावर जिवापाड प्रेम करणारी ..त्यांच्यासाठी जीवाला जिव देणारी माणसे 1984 च्या काळात सुद्धा होती.आता सुद्धा आहेत….
आणि पुढे देखील राहतील…..
आदरणीय बहूजनहृदय सम्राट बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है..
“होय बाळासाहेब आम्ही सुद्धा
त्या शेतकरी बाबाचे गुण घेऊ….
अहो तुमच्यासाठी तण मण धनच काय
पण वेळप्रसंगी हा जीव देखील देऊ…”
✍🏻अनिल खरात लिंगेकर
ता.सिंदखेड राजा
जि.बुलडाणा
9146345035
7620520415
🤝🏻🤝🏻🔹🔹🤝🏻🤝🏻🔹🔹

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: