कोरोना परिस्थिती तसेच आगामी पावसाळ्यात शेतीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा :- प्रकाश आंबेडकर

0
4

अकोला : – सध्या देश तसेच राज्यात कोरोना चे संकट आले आहे आणि तर पावसाळा लागल्याने शेतकरी तसेच मजूर यांची परिस्थिती योग्य नाही.कोरोना परिस्थिती तसेच आगामी पावसाळ्यात शेतीच्या नियोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता.
“काय म्हणाले प्रकाश आंबेडकर

या लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या लोकांची प्रचंड नुकसान होत आहे. अशा लोकांसाठी जेवणाची व्यवस्था प्रशासनाने करावी. आज अनेक समूहांकडे रेशन कार्ड नाहीये, त्यांनाही रेशन उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जासाठी सातबारा उतारा आणि शेतसाराची अट शिथिल करावी. (पीक कर्जाची अट जिल्हा अधिकाऱ्यांनी ताबडतोब मान्य केलीय), तसेच जिल्ह्यात कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात महत्त्वाच्या सूचना यावेळी आम्ही प्रशासनाला दिल्या.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ घावकर, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी,जिल्हा परिषद अध्यक्ष,’वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता डॉ. धैर्यवर्धन फुंडकर, प्रवक्ता राजेंद्र पातोडे, महिला आघाडीच्या महासचिव अरूंधती सिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रदिप वानखडे आदी उपस्थित होते.

इथे हि वाचा
राम कदम यांनी मुंबईतील एका नाल्याचा व्हिडीओ शेअर करून यावर होणारा कोट्यवधींचा खर्च जातो कुठे असा सवाल केला आहे

नाशिक शेतकऱ्यांना करणार मदत -छगन भुजबळ

मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here