अजित पवार – भविष्यातील गरजा लक्षात घ्या…

0
5

बारामती |  शहरातील तसेच तालुक्यातील सुद्धा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन प्राधान्याने विकास कामे मार्गी लावण्याचे काम सुरू करा अशा सूचना, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या.

प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओहोळ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित असताना बारामती येथे सुरू असणाऱ्या विकास कामांच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पाहणी केली.

  कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची , माळेगाव व मेडद येथे होणाऱ्या नवीन रस्त्यांची कामे, तांदूळवाडी येथील पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव, क्रिडा संकुल, गौतम बाग येथे सुरु असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक त्या सूचना सुद्धा दिलेले आहेत.

बारामती मध्ये विविध ठिकाणी विकास कामे सुरू असलेल्या जागांवर बारामतीच्या हवामान मध्ये देशी राहणाऱ्या वृक्षांची लागवड करावी,आसपासचा परिसर सुशोभित दिसावा, कामाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना प्रसन्न वाटले पाहिजे ,असे वातावरण असावे अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

इथे ही वाचा

परेश रावल-देवा..! आम्हाला नरेंद्र मोदी दिल्याबद्दल तुमचे आभार….

भ्रष्टाचार करणाऱ्या महासंचालकाला भाजप, महाआघाडी सरकारचे अभय – राजेंद्र पातोडे

फडवणीस सरकारने सत्तेत असताना काय दिवे लावले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here