कोरोनावर मात करण्यासाठी अजित पवारांनी उचललं धाडसी पाऊल…

पुणे |  शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. यावरच राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोणा वर मात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आता ४ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेमणूक करण्यात आलेली आहे.

पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे ग्रामीण आणि कँन्टोंन्मेंट बोर्डांच्या हद्दीतील कोव्हिड लॅब व चाचणी संबंधीत कामगिरी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य सचिव विश्वजीत माने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्या संबंधीचे जबाबदारी क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर खाटा उपलब्ध करून देणे व रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांचे व्यवस्थापन करणे, या गोष्टींची जबाबदारी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर यांच्याकडे देण्यात आली आहे.त्याचबरोबर सर्व सामाजिक संस्थांना मदत करणे लोकसहभाग वाढवणे ही जबाबदारी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे देण्यात आली आहे, याबद्दलची सर्व माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

शहरात दिवसेंदिवस करणाऱ्यांचा आकडा भारत वाढत असल्यामुळे संक्रमणाची चाचणी तोडणे, या प्रकारच्या सर्व सुविधा पुरवणे तसेच सोशल डिस्टंसिंग सुद्धा पालन करणे या सर्व बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

Share

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: