मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात चाललेल्या वादात अखेर नवीन वळण आले आहे. समोरासमोर दोघांची गळा भेट सुध्दा झाली,

1
5

जुन्नर तालुक्यातील शिरोली जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक मनोरुग्ण आणि बेघर लोकांसाठी काम करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे आणि विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमव सत्यशील शेरकर यांच्यात हा वाद सुरु होता. सत्यशील शेरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर नेऊन आपल्याला मारहाण केली तसेच आपल्या डोक्याला पिस्तुल लावून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप अक्षयनं केला होता.
त्याने फेसबुक च्या माध्यमातून असे सांगितले होते. व त्या नंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळून तो लोकप्रिय होऊन त्याच्या विरोधात असणाऱ्या ला ट्रोल केल्या गेले होते.यात तर प्रकरणात राजकारणी नेते अमोल कोल्हे तसेच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिल्या होत्या.शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये व हा वाद कुठेतरी थांबावा या उद्देशाने गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास कमिटी व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन त्यांच्यातील वाद चर्चेतून सामोपचाराने मिटवला आहे.

इथे हि वाचा
कंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन

धक्कादायक – महाविद्यालयीन ९०% विद्यार्थी केले नापास

ठाण्यात रुग्णालयांचा अ‍ॅडमिट करुन घेण्यास नकार, गर्भवती महिलेचा रिक्षामध्ये मृत्यू

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here