अक्षय कुमारने नाशिकपाठोपाठ मुंबई पोलिसांनाही केली मदत

मुंबई | कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक जणांकडून शक्य असेल ती मदत करताना दिसून येत आहे. अशाच मदतीच्या हातामध्ये चित्रपट सृष्टीतील अभिनेते आघाडीवर असताना दिसून येत आहे. अशाच आता बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार चित्रपटाबरोबरच सामाजिक कार्यातहीखूप पुढे असल्याचे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.

अक्षय कुमारने मागच्या महिन्यात नाशिक पोलिसांना ‘फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिव्हाईस’ दिले होते.हे उपकरण आता अक्षयकुमार कडून मुंबई पोलिसांना सुद्धा देण्यात आलेले आहे . या उपकरणामुळे कोरोना योध्यांची ऑक्सिजन पातळी, शरीराचे तापमान आणि हृदयाची गती तपासण्या तपासण्यासाठी मदत होणार आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी अक्षय कुमार ने केलेल्या मदती बद्दल त्यांचे आभार मानलेले आहेत. व अक्ष य जी हे नेहमीच आपल्या देशाच्या सैनिकांसाठी आणि विविध राज्यातील पोलिसांची मदत करत असतात .तुम्ही केलेल्या मदतीसाठी तुमचे खूप खूप आभार. असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर ट्विट करत अक्षय कुमार चे आभार मानलेले आहे. यातील काही उपकरण बृहन्मुंबई महानगरपालिकेत वापरण्यासंदर्भात आम्ही चर्चा केली आहे.

अक्षय कुमार ने काही महिन्यांपूर्वीच करण्याच्या पार्श्वभूमीवर 25 कोटी रुपये प्रधानमंत्री सहाय्यता निधीत मदत केलेली होती. आता लवकरच अक्षय कुमार ‘सूर्यवंशी, लक्ष्मी बम, बच्चन पांडे आणि पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना दिसून येणार आहे.

इथे ही वाचा

मी कृषीमंत्री होतो त्यावेळी शेतकऱ्यांवर…, एकनाथ खडसेंचा ठाकरे सरकारवर प्रहार!

साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: