मुंबई | हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमार यांनी आपले मत व्यक्त केले . माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत, माझ्या मुलांना घराणेशाहीचा फायदा बिलकूल मिळणार नाही. असं अक्षयने म्हटलं.
माझ्या मुलांना जर इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर मी माझ्या स्टारडम’चा फायदा त्यांना घेऊ देणार नाही असं अक्षयने म्हटलं त्याच बरोबर घराणे शाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबियांना काम देण्यापासून अडवू शकत नाही. असे अक्षय कुमार म्हणाला.
आई-वडिलांच्या ओळखीमुळे एखाद्या व्यक्तीला संघर्ष न करता सुद्धा काम मिळू शकते परंतु मेहनत केल्याशिवाय घराणेशाहीचा आधार घेतला तरी सुद्धा इंडस्ट्रीत जाता येत नाही. असंही त्यानं मुलाखतीत सांगितलंय.
मी माझ्या दोन्ही मुलांना म्हणजे आरव आणि नीतरा ला आत्मनिर्भरतेचे धडे शिकलेले आहेत. त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर ऑडिशन द्यावेत व कामे मिळवावीत अशा प्रकारचे वक्तव्य करत अक्षय कुमार नेपोटीसंम ला विरोध दाखवला आहे.
इथे हि वाचा
कोरोना व्हायरस आपोआप नाहीसा होईल- डोनाल्ड ट्रम्प