राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; मुंबईसाठी रेड अलर्ट जारी

मुंबई | राज्यातील मान्सून चांगलाच सक्रिय झालेला दिसून येत आहे. काल रात्रीपासून कोकणासह मुंबईतील काही विभागांमध्ये पावसाने चांगलाच जोर घेतलेल्या दिसून येत आहे. उपनगर मध्ये होत असलेल्या पावसामुळे हवामान खात्याकडून मुंबईसाठी हायअलर्ट करण्यात आलेलं आहे .येत्या चोवीस तासांमध्ये हवामान खात्याकडून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

मुंबई ठाणे पुणे रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी सुद्धा हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कालपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झालेली दिसून आलेली आहे.

मुंबई शहरामध्ये पावसाचा जोर अद्याप कायम राहील या पार्श्वभूमीवर शहरात दुपारी भरतीची शक्यता वर्तवण्यात आलेली असून. समुद्रात 4.51 मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता असल्यामुळं नागरिकांनी सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे या काळामध्ये कोणीही समुद्र किनारी जाऊ नये.

दरम्यान, काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ या भागांमध्ये पाणी साचलं आहे. उपनगरांमधील वाहतूक व्यवस्थेवर सुद्धा या पावसाचा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

इथे ही वाचा

अमित शहांना कोरोना झाल्यावर ते सरकारी रूग्णालयात का गेले नाहीत

अमित शहांना कोरोना झाल्यावर ते सरकारी रूग्णालयात का गेले नाहीत

Viral : इंटरनेटच्या चांगल्या स्पीडसाठी कायपण; अधिकारी थेट छतावरुन बसून भरतो आहे पीक विम्याचे अर्ज

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.