शिवराज्याभिषेक दिनासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप; पुण्यात भाजप नेत्याविरोधात तक्रार

1
4

पुणे | शिवराज्याभिषेक दिनाची आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत पुण्यात भाजप नेत्यावरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी याप्रकरणी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी रात्री शिवराज्याभिषेक दिनासंबंधी एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी शिवराज्याभिषेकाला हिंदू साम्राज्य दिवस असं संबोधलं. त्यावर धनंजय शिंदे यांचा आक्षेप आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत आज के शिवाजी-नरेंद्र मोदी या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. अशा प्रकारे दिल्लीतून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.

शिंदे यांनी यासंदर्भात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे, तसेच संबंधित नेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी ट्विटरवरही चांगलीच गदारोळ पहायला मिळाला

इथे हि वाचा
विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू

स्टर्लिंग इंजिनचे आविष्कारकर्ते -डॉ.रॉबर्ट स्टर्लिंग

पैसा सर्वस्व नाही…

1 COMMENT

  1. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी राजे . आज त्यांचा रज्याभिषक सोहळा दिवस. छत्रपतिंचा राज्याभिषक होउ नये असे त्याकाळी सुध्दा ब्राम्हणांना वाटायचे एवढूच नाही तर ब्रम्हणानी त्यावर विरोध केला , जसे तसे काशिच्या ब्राम्हणांला तयार केले तर तो दुसरीच वल्गना करत राहिला संभाजी राजांनी ओळखुन त्या गागाभट्टाला भानावर आणलं आणि सोहळा रितीने पार पाडला.
    पण बंधुनो गेल्या पाच सहा वर्षापासुन असे कितीतरी लेख नेट वर पाहायला मिळतात कि मराठा साम्राज्याची जडनघडन पेशवाईने केली. एवढ्यामोठ्या शक्तीना शिवाजीराजांनी मावळ्यांना सोबत घेउन ब्राम्हणांना तोंड देत रयतेचं राज्य उभा केलं आणि वैभव विलास पसंद करनारे पेशवे ,आपल्या बायकोला गहान ठेवनारे नानासाहेब पेशवा2 यांचा उदोउदो होत आहे .अशा प्रकारचे लेख लिहिनारे हे ब्राह्मण शाहीने प्ररित असतात व शिवाजी राजांचे सत्य लपवतात .
    मी काय विचारक नाही पण मनात आले म्हणून व सत्य इतिहास कारांनी जनतेला दाखवावे म्हणुन लिहिलं .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here