🌐🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🌐
*”मला बाबासाहेबांच्या चळवळीचे कार्य करायचे होते.. पण…❓❓”*
😇 *बालपण-खेळण्यात गेले.*
🧓🏻 *किशोरवय-शालेय शिक्षण घेण्यात गेले.*
👨🏻🎤 *तारूण्य-काँलेजमध्ये गेले.*
👨🏻💼 *युवाअवस्था-करिअर करण्यात गेले.*
👨🏻✈ *प्रौढ अवस्था-नोकरी आणि बायका पोरांमध्ये गेले आठवड्यातील एक सुट्टी भेटत होती. काय करणार? मुलांचे शिक्षण केले,त्यांचे करिअर केले त्यांची लग्न केली.आता रिटायरमेंट झाली…विचार केला आता तरी चळवळीचे काम करतो, पण नातवंडांना कोण सांभाळणार..? नातवंड थोडी मोठी झाली की सुरु करतो.*
🎅🏻 *वृध्दा अवस्था-बाबासाहेबांच्या चळवळीचे कार्य आता सुरूच करायचे होते..पण काय करू आता शरीर साथ देत नाही. पुढच्या जन्मी खरंच काम करायची खूपच इच्छा आहे.*
❓ *अशीच सर्वांची कहाणी असेल तर बाबासाहेबांनी चालवलेली चळवळ कोण पुढे नेणार…? म्हणूनच आपल्या आयुष्यातील महत्वाचा वेळ काढून जे लोक त्यागवृत्तीने चळवळ चालवित असतात त्यांना तुम्ही सहकार्य तर करू शकतात. तुमच्याकडे वेळ नाही तरी इच्छा असेल तर तुम्ही तन-मन-धनाने सहकार्य करू शकतात. पण यापैकी तुम्ही काहीच करायला तयार नसाल, तर आपणच बाबासाहेबांच्या चळवळीला नष्ट करीत आहोत, असाच याचा अर्थ निघतो…काहीना हे पटणार नाही.. पण हेच निर्विवाद सत्य आहे. चळवळ चालविण्यासाठी वेळ-बुध्दी व पैसा लागतो..तुम्हाला यापैकी जे जे देता येत असेल ते ते तुम्ही दिलं पाहिजे, कारण आपल्याकडे जे जे आहे, ते सर्व बाबासाहेबांचे आहे. आणि जे बाबासाहेबांचे आहे.. ते सर्व समाजाचे आहे…!*
*बाबासाहेबांची चळवळ प्रामाणिकपणे चालवणा-यांना सहकार्य करणे,म्हणजेच त्यांना वैयक्तिक मदत नसते, ती समाजाला मदत असते. हे गृहित धरून जे लोक आपले योगदान देत आहेत,ती माणसं खरोखरच “धन्य” आहेत.मी अशांचा खरोखरच ऋणी आहे.*
*सभानायक-किरण मोहिते.*
*भारतीय हितरक्षक सभा*
🇮🇳 *भारत* 🇮🇳
*दि.2 एप्रिल 2018*
🌐🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🤷🏻♂🌐