कोरोनामुळे महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू!

Spread the love

मुंबई | कोरोनाचा संसर्ग सगळीकडे कमी होताना दिसत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाल्याचं चित्र होतं, मात्र आता पुन्हा कोरोना डोकं वरक काढतो की काय?, अशी परिस्थिती काही शहरांमध्ये तयार झाली आहे. त्यामुळे जिथे कोरोनाचा संसर्ग वाढतोय, अशा शहरांमध्ये नियम कडक करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

आप्पती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अमरावती जिल्ह्यात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे त्यानुसार, पाच पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येता येणार नाही. यात्रा, उत्सव, सभा, संमेलन सगळ्यांवर बंदी राहील तसेच लग्न समारंभासाठी सशर्त 50 लोकांना परवानगी दिली जाईल. तसेच नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सर्व आस्थापना आणि बाजारपेठा खुल्या राहतील पण प्रशासनाने गर्दीला प्रतिबंधित करणारा कायदा लागू केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाभरातील शाळांना 28 फेब्रुवारी पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. शनिवारी एकाच दिवसात 376 कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हा निर्णय घेतला आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता प्रशासनाने यामधून सुट दिली आहे. फक्त दहावी बारावी चे कोचिंग आणि महाविद्यालयीन वर्ग वगळता इतर सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इथे हि वाचा

“नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही”

अवैधरित्या दारु विकण्यासाठी घेतला देवाचा आधार; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हैराण

धक्कादायक! हॅार्न वाजवल्याचा राग आल्याने चालकाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली

 


Spread the love