मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाणं नुकतंच रिलीज झालं आलं. सध्या सोशल मीडियावर अमृता फडणवीसांचं हे गाणं चागलंच व्हायरल झालं आहे.
‘झी म्यूझिक मराठी’च्या ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ‘डाव मांडते भीती’, असं गाण्याचं शीर्षक असून व्हिडीओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवली आहे.
अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करतमराठी चित्रपट ‘अंधार‘ मधील जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेले माझे गीत नक्की ऐका, असं म्हटलं आहे.
दरम्यान, अमृता फडणवीस याआधी गाण गायलं आहेत. अलग मेरा ये रंग है, मेरी खुदसेही जंग है, जीत जाऊ ऐ खुदा, अगर तु मेरे संग है, असं या गाण्याचे बोल होते.