मुंबई | आज मुंबई शिक्षण विभागाचा 2021-2022 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यावेळी अर्थसंकल्प सादर करताना सहआयुक्तांनी पाणी समजून सॅनिटायझर प्यायलं. या घटनेमुळं आयुक्तालयात धांदड उडाली.
शिक्षण समितीचं बजेट मांडण्यापूर्वी सहआयुक्त रमेश पवार यांनी पाणी समजून सॅनिटाईझर प्यायलं. ही गोष्ट लक्षात येताच शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या जोशी यांनी पवार यांना पाण्याची बॉटल दिली.
शिक्षण विभागाचे सहआयुक्त अशितोष सलिल यांची तब्येत ठीक नसल्यानं रमेश पवार यांच्यावर अर्थसंकल्प वाचनाची तयारी सोपवण्यात आली होती.
दरम्यान, महानगरपालिकेच्या शाळांबद्दल जनतेच्या मनात सकारात्मक दृष्टिकोण निर्माण व्हावा यासाठी नगरपालिकेच्या शाळांचं नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे