… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप

0
192

मुंबई | देशात आणि राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुणे आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मास स्क्रिनिंग करण्यात येत आहे. यावरून चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यानं टीका केली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे पुण्यानंतर मुंबईतही स्वयंसेवकांकडून मास स्क्रिनिंग करण्यात आलं हे टीकाकारांनी पाहावं, अशा आशयाचं ट्विट एका युझरनं केलं होतं. यावर अनुराग कश्यपनं पुन्हा ट्विट करत टीका केली आहे.

जर हीच पीपीई किट्स पोलीस, डॉक्टर्स आणि नर्सेसना दिली असती तर संघाला आपला गणवेश बदलण्याची गरज भासली नसती, असं म्हणत अनुरागने संघावर निशाणा साधलाय.

दरम्यान, जर तुम्हाला रिस्किंग लाईफ पाहायची असेल तर जे लोक अनवाणी रस्त्यांवर निघाले आहेत त्यांच्याकडे पाहा. प्रचाराची पण एक मर्यादा आहे, असं ट्विट अनुरागने केलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here