भोपाळ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच पोलिस अधिकारीआपल्या परिवारासोबत वेळ घालवण्यासाठी हळू हळु सुट्टीवर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच मात्र मध्य प्रदेशातील एका पोलिस कर्मचाऱ्याने वरिष्ठांकडे सुट्टी साठी केलेला अर्ज बघून सर्व आश्चर्य चकित झाले.
रेवा येथील Special Armed Forces मध्ये कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां ने म्हशीची काळजी घ्यायची आहे असे कारण देऊन सुट्टी साठी अर्ज केला.
माझ्या घरी एक म्हैस आहे ती मला अत्यंत प्रिय आहे व ती आणि तिचं नुकतंच जन्मलेलं वासरू मला अत्यंत प्रिय आहे. व त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही .गेल्या दोन महिन्यांपासून आईची तब्येत बरी नाहीये.व यासाठी मला सहा दिवसांसाठी सुट्टी घ हवी आहे असं कर्मचाऱ्याकडून अर्जात लिहिण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की ,त्या म्हंशीचे माझ्यावर अत्यंत उपकार आहेत. त्याच म्हशीचे दूध पिऊन मी पोलीस भरतीचे परीक्षा पास झालो आहे व तिचे उपकार फेडण्याची वेळ आली आहे . म्हणून माझी सुट्टी मंजूर करावी कारण मी माझ्या आईची आणि म्हशींची सेवा करू इच्छितो.
इथे हि वाचा
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलेली भीती… येत्या दोन महिन्यात वाढणार रुग्ण..
सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…
भारतात कोरोना ने तोडला रेकॉर्ड, गेल्या 24 तासात धक्कादायक आकडेवारी…..