अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळ निर्माण झाले

0
8

मुंबई अरबी समुद्रात कमी दाबाचा
पट्टा निर्माण झाल्याने हे चक्रीवादळ निर्माण झाले असून या चक्रीवादळला बांग्लादेश ने “निसर्ग” असे नाव दिले आहे.
तर महाराष्ट्रात या वादळाचा धोका
3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण भागातून जाण्याचा इशारा दिला गेला आहे
रत्नागिरी तसेच मुंबई वर या वादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळा दरम्यान..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

1. निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारीपट्टीवर पोहोचण्याचा इशारा
2. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात सतर्कतेचा इशारा
3. मच्छिमारांना समुद्रातून परत बोलवण्यात आले आहे, जीवितहानी होणार नाही, हे पाहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
4. मदत आणि बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 पैकी 10 तुकड्या तैनात, 6 तुकड्या राखीव
5. कच्चा घरात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी दवंडी आणि लाउडस्पीकरने सूचना, पक्की निवारागृहे तयार
6. मदत आणि बचावकार्य करताना कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन काळजी घेण्याच्या सूचना, नॉन कोविडसाठी रुग्णालये उपब्लध करण्याचे निर्देश
7. वीज पुरवठा खंडित होणार नाही, तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणुऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी
8. वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता पाहून प्रशासनाला खबरदारी घेण्याचे निर्देश
9. मुंबईच्या सखल भागातील झोपड्डपट्टीवासियाना स्थालांतरित करण्याच्या सूचना
10. आवश्यकता भासल्यास अधिक रुग्णालये आणि जनरेटरची सुविधा करण्याचे निर्देश
11. मंत्रालयात 24 तास नियंत्रण कक्ष सुरु, लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना

इथे हि वाचा
अकोल्यातील हे चार हवालदार बनवले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक.
पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस मित्रालाच पोलिसांकडून बेदम मारहाण
देशाचे नाव बदला पुढील तारीख न देता, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण तहबुक करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here