अरविंद बन्सोड यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

0
3

नागपूर : अरविंद बन्सोड यांच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात येणार असून बन्सोड कुटुंबियांना न्याय मिळवून देणार, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली. मृतकाच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी ते जलालखेडा तालुक्यातील पिपळधरा येथे आले होते.

२७ मे रोजी अरविंद बन्सोड यांना मारहाण झाली व नंतर त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्र्यांनी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना दिले. यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपायुक्त सामाजिक न्याय डॉ.सिद्धार्थ गायकवाड व सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी मृतक अरविंदचे वडील जनार्दन बन्सोड व भाऊ किशोर व धीरज यांच्याकडून घटनेची तपशीलवार माहिती घेतली.या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून निष्पक्ष व सखोल चौकशी करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती पालकमंत्र्यांनी या भेटीत दिली. या प्रकरणाची योग्य चौकशी करुन बन्सोड कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना त्यांनी दिल्या. त्याचप्रमाणे बन्सोड कुटुंबाला सुरक्षा पुरविण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

इथे हि वाचा

चपलेनं मारहाण केल्याप्रकरणी टिकटॉक स्टार भाजपा नेता सोनाली फोगाट यांना अटक..

झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी वंचितचे राज्यभर आंदोलन, निवेदनांचा पडला पाऊस, हे सरकार जातीय व धर्मवादी – प्रकाश आंबेडकर

खाजगी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची फी तीन महिन्याकरिता माफ करावी विद्यार्थी संघटनेची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here