राम मंदिर पायाभरणीच्या दिवशी असदुद्दीन ओवैसींचं एका ओळीचं वादळी ट्विट…!

हैदराबाद / राम मंदिराच्या भूमिपूजनाचा इतिहासिक दिवस आज उजाडलेला असून आयोध्या नगरी मध्ये दिवाळी सणाला सुरुवात झालेली दिसून येत आहे .व अनेकांच्या आनंदाला पाराच उरलेला नाही अशातच एम आय एम चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी काही ओळींचे ट्विट करत खळबळ उडवलेली आहे.

राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना ते म्हणाले, बाबरी मशिदी तेव्हाही होत्या व आजही आहेत आणि पुढेही राहतील अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.व तसेच बाबरी जिंदा है… अशा हॅश टॅगचा वापर करत बाबरी मशीद चा जुना फोटो त्यांनी टाकला आहे.

ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वीच धर्मनिरपेक्षता हा संविधानाचा पाया आहे व मोदींनी भुमिपुजन सभारंभात सहभागी होणे हे संविधान शपथेचे उल्लंघन करणे असेल असं मत व्यक्त केले होते.व आता भूमिपूजनाला काही तास शिल्लक असताना त्यांनी केलेल्या ट्विटमुळे वातावरण तापलेले दिसून येत आहे.

त्याचबरोबर ओवैसी यांनी यावेळी सांगितलं .बाबरी मशीद असून ती कायम राहणार आहे. व ही माझी श्रद्धा असून त्यापासून मी किंवा कोणीही पळ काढू शकत नाही.1959 मध्ये मशिदींमध्ये गुप्तपणे मूर्ती ठेवण्यात आलेल्या व त्या व त्यानंतर 1992 मध्ये मशीद पाडल्याची घटना घडून आली. व आम्ही नव्या पिढीला सांगतच राहू की आपली मशीद पाडण्यात आली.

इथे ही वाचा

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज…

राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याचा अशुभ मुहू्र्त म्हणूनच अमित शहांना अन् मंदिरातील पुजाऱ्यांना कोरोना”

‘बाॅयकाॅट चायना’ म्हटलं तर ते आत्महत्या केल्यासारखं होईल- रघुनाथ माशेलकर

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.