मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात; रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते.अखेर आठ दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

24 मे रोजी अशोक चव्हाण यांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. त्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर चव्हाण यांना रुग्णवाहिकेने नांदेडवरून मुंबईत आणण्यात आले होते.

कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर मंत्री योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठका किंवा इतर बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पाडल्या जात आहेत. तर प्रत्यक्ष होणाऱ्या बैठकीमध्येही कमी उपस्थिती आणि योग्य ते अंतर पाळलं जात आहे. एवढं करूनही मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, अशोक चव्हाण रूग्णालयातून देखील चांगलेच सक्रिय असलेले पाहायला मिळाले होते. त्यांनी काँग्रेसच्या देशव्यापी स्पीक अप इंडिया आंदोलनात रूग्णालयातून सहभाग घेतला होता.
इथे हि वाचा
तुम्ही कोरोनाचा आलेख खाली आणायचा सोडून अर्थव्यवस्थेचाच आणला- राजीव बजाज
तुम्ही हत्तीचा नाही माणुसकिचा खून केला आहे
129 वर्षानंतर मुंबईने अनुभवल चक्रीवादळ आणि मुंबई मध्ये झालेले नुकसान

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: