मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने अटक केली आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
हे राष्ट्रवादीचे नेते घरात उकिरडा माजलाय आणि जगाला शहाणपण शिकवतात, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहेत.
नबाब मलिक इतके वाह्यात कसे बोलतात हे लक्षात आलं का, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी नबाब मलिक यांच्यावर निशाणा साधलाय.
दरम्यान, ड्रग्ज तस्करीप्रकरणी अटक केलेल्या ब्रिटिश नागरिक करण सजनानीशी त्यांचा ड्रग्ज तस्करीतून आर्थिक व्यवहार झाल्याच्या आरोपातून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यापूर्वी या अनुषंगाने त्यांची सुमारे दहा तास सखोल चौकशी करण्यात आली.