“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”

मुंबई | डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की जेव्हा डॉ. मनमोहनसिंह बोलतात तेव्हा जग ऐकतं, त्यांच्याबदद्ल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरत यांनी म्हटलं आहे.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंह हे सज्जन व्यक्ती होते, तरी त्यांचं सरकारवर कोणतंही नियंत्रण नसल्याने त्या काळात देश रसातळाला गेला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. याला बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं.

डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी GDP नोंदवला, ज्यांच्या 10 वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर 7.5% राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचं प्रदर्शन केलं आहे, असं म्हणत थोरातांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने GDP च्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख मोदींनी स्वतःच देशाला पटवून दिली आहे, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलंय.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.